पावसाळी अधिवेशनाच्या तयारीला सरकार ?

उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. पण याबाबत विरोधीपक्षांनाही निमंत्रण दिले जात तसे निमंत्रण अद्याप आम्हाला मिळालेले नाही, असे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्या खरच मंत्रिमंडळ विस्तार होईल का? याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

मात्र पावसाळी अधिवेशन घ्यायचे असेल तर त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणे गरजेचे आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाबाबत उद्या होणारी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार होती ती पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच अधिवेशन घेता येत नाही, असेही बोलले जात आहे. त्यामुळे अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पावसाळी अधिवेशन १८ ते २६ ऑगस्ट या काळात होईल असे सांगितले जात आहे. कारण उद्याचा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास प्रत्येक मंत्र्यांना आपल्या खात्याची जबाबदारी समजून घ्यावी लागणार आहे. कारण बरेचसे मंत्री नव्याने येणार आहेत. त्यामुळे त्यांना थोडा वेळ देणे आवश्यक असते. या कारणामुळे अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.