श्रद्धा हत्याकांडातून अजून देश उभारला नाही तोच पुन्हा एक तशीच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. पैश्याच्या वादातून महिलेचे अवयव छाटून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कोंबडी कापण्याच्या चाकूने महिलेचे हात, कान आणि स्तन कापले त्यात तिचा रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील पीरपैंती गावात घडली आहे. घटनेने जिल्ह्यासह राज्य हादरले असून घटनेच्या क्रूरतेने अनेकांचा थरकाप उडाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम यादव नावाची महिला आपल्या पती आणि मुलासोबत बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील पीरपैंती गावात राहत होती. याच गावात आरोपी शकील आणि त्याचा भाऊ मोहम्मद जुद्दीन हे देखील वास्तव्यास होते. महिला आणि आरोपींमध्ये पैश्यावरुन वाद होता. महिन्याभरापूर्वी त्यांच्यात यावरून भांडण देखील झाले होते.
मात्र शनिवारी (दि. ३ ) महिला आपल्या मुलासोबत पीरपैंती बाजारात गेली होती. घरी परतताना मुलाने तिला सिंघिया पुलापासून काही अंतरावर सोडले आणि नंतर तो बाहा येथे थांबला. महिला पायीच घरी जायला लागली. तेव्हा तिच्या एकटेपणाचा फायदा घेत शकील आणि जुद्दीनने तिला अडवले.
व भांडण उकरून काढत आरोपींनी कोंबडी कापण्याच्या चॉपरने महिलेवर हल्ला केला. महिलेचे हात, कान आणि स्तन कापले. आरोपी तिचे पायही कापणार होते, पण कुणाची तरी चाहूल लागताच ते तिथून पळून गेले. जवळून जात असलेल्या एका व्यक्तीला महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यावर त्याने घटना सर्वाना सांगितली.
मुलगा घटनास्थळावर दाखल झाल्यावर त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिला उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र जास्त रक्त वाहिल्याने तिचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी शकील आणि त्याचा भाऊ मोहम्मद जुद्दीनला अटक केली आहे.
पतीचा आरोप
मृत महिलेचा पती अशोक यादवने सांगितले की, ते किराणा दुकान चालवतात. त्यांची पत्नी नीलमही दुकानात बसायची. मोहम्मद शकील कोणत्याही कामाशिवाय त्यांच्या दुकानावर यायचा. एके दिवशी पत्नी त्याला म्हणाली की, तुझे वागणे ठीक नाही, तु दुकानावर येत जाऊ नको.शकील त्यानंतर दुकानात तर आला नाही. मात्र याचा राग त्याने मनात ठेवला आणि असे घडले असे महिलेच्या पतीने सांगतले.