विकृतीचा कळस! वादातून शेजाऱ्यानेच १० वर्षीय मुलीवर अत्याचार करत केली हत्या..

पालघर जिल्ह्यातून एक संपातजनक घटना समोर येत आहे. शेजाऱ्यांसोबत असलेल्या वादातून एकाने त्यांच्या दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. ही संतापजनक घटना जिल्ह्यातील तालसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या घटनेने परिसर हादरला असून पालघर जिल्ह्यात एकच खळखळ उडाली आहे. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात दहा वर्षीय मुलगी घरातून शाळेत जाण्यासाठी निघाली होती, मात्र रात्री दहा वाजले तरीही ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिची शोधाशोध केली. मात्र तरीही ती सापडली नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, आपली तपासाचे चक्रे फिरवत सगळीकडे झाडाझडती घेतली. तपासात पोलिसांनी एका परिसराचे सीसीटीव्ही फूटेज मिळवले. या सीसीटीव्ही फूटेजमधून मुलीला मोटर सायकलवरून नेत असलेला एक व्यक्ती दिसला. चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती मुलीच्या घराशेजारीच राहणारी असल्याचे पोलिसांना समजले.

पोलिसांनी मुलीला दुचाकीवरून देणारा रमेश दुबळा (वय. ४५) याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी रमेश दुबळा याने शेजाऱ्यांसोबत असलेल्या वादातून त्यांच्या मुलीला ती शाळेत जात असताना मोटरसायकलवर बसवले घरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळा परिसरात मुलीला नेले. या परिसरातील निर्जन स्थळी तिच्यावर अत्याचार केला आणि तिची हत्या केल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.