Home » नाशिक विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर..!

नाशिक विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर..!

by नाशिक तक
0 comment

By : Pranita Borse

नाशिक : नाशिक विमानतळ (Nashik Airport name issue) नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या आधी देखील नाशिकच्या विमानतळाला वेगवेगळ्या महापुरुषांचे नाव देण्याची मागणी झाली होती. दरम्यान आता नाशिक विमानतळाला “जटायू” हे नाव देण्यात यावं अशी मागणी झाली आहे. महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी ही मागणी केली आहे. तर नाशिक नगरी ही प्रभू श्रीरामचंद यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नागरी आहे. आणि रामायणात जटायू यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे नाशिकच्या विमानतळाला ‘जटायू’ हे नाव देण्यात यावं अशी मागणी महंत अनिकेत शास्त्री यांनी केली आहे.

  • नाशिक विमानतळाच्या नावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर..
  • नाशिक विमानतळाला “जटायू” नाव देण्याची मागणी.
  • नाशिक नगरी प्रभू श्रीरामचंद यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे अनिकेत शास्त्री
  • रामायणात जटायू यांचे योगदान मोठे आहे अनिकेत शास्त्री

नाशिक विमानतळ नामकरणाचा मुद्दा ; महंत अनिकेत शास्त्री यांची विनंती

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि उड्डाण मंत्री यांना नम्रपणे प्रतिपादन करू इच्छितो की, नाशिक विमानतळाला जटायू एअरपोर्ट या नावाने संबोधले जावे. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक नगरी ही कुंभ नगरी आहे आणि जटायू यांचे रामायणात अमुल्य असे योगदान आहे. त्यामुळे हे एअरपोर्ट जटायू या नावाने संबोधले जावे, असे मी सर्व संत समाजाच्या वतीने, हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आणि नाशिक नगरवासीयांच्या वतीने विनंती करू इच्छितो.

– महंत अनिकेत शास्त्री देशपांडे

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची होती मागणी

नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून मागणी होत आहे. परंतु, या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये रोष पाहायला मिळाला होता.

रामायणात जटायू यांचे मोठे योगदान

जटायू हे रामायणातील प्रसिद्ध गरुड पात्र आहे. रावण सीतेला पळवून लंकेत घेऊन जात असताना जटायूने ​​सीतेला रावणापासून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या रावणाने त्याचे पंख छाटले त्यामुळे तो जमिनीवर पडला. सीतेचा शोध घेत राम आणि लक्ष्मण तिथे पोहोचले तेव्हा त्यांना सीतेच्या अपहरणाची संपूर्ण माहिती जटायुजींकडूनच मिळाली होती. अगदी कमी वेळेसाठी जटायू हे पात्र रामायणात दाखवण्यात येते मात्र त्यांच योगदान खूप मोठं आहे. अशी मान्यता आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!