नाशिक | येथील नोटप्रेस परिसरात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जुन्या नोटांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आज नाशिकरोड येथील सी एन पी प्रेस येथे या प्रदर्शनाचे उद्धघाटन करण्यात आले. केंद्र सरकारने केलेल्या सूचनेनुसार स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने दुर्मिळ जुन्या नोटांचे प्रदर्शन भरवण्यात आलंय. जेलरोडच्या सी एन पी नोट प्रेससमोरील रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट इमारतीत येथे प्रथमच प्रदर्शन बुधवार ८ जुन पासून भरवण्यात आले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्धघाटन खासदार हेमंत गोडसे तसेच प्रेस महामंडळाच्या सीएमडी तृप्ती पात्रा घोष यांच्या हस्ते करण्यात आले.
आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात छापलेल्या पहिल्या नोटांपासून ते आतापर्यंतच्या सर्व नोटा लावण्यात आल्या आहेत त्यामुळे छपाईतील विविध टप्प्यांवरील दुर्मिळ नोटा प्रदर्शनात दिसणार आहे. नोटा छपाईचा इतिहासही या प्रदर्शनामुळे नागरिकांना कळणार आहे. १९२८ मध्ये भारतात पहिली नोट ज्या करन्सी नोटप्रेसमध्ये छापण्यात आली त्या करन्सी नोटप्रेसच्या नोटा छपाईचा अनमोल खजीना नाशिककरांना प्रदर्शनातून बघता येणार आहे. नाशिकरोडमधील करन्सी नोटप्रेसमध्ये छापण्यात आलेल्या पहिल्या नोटेपासून ते आजवर छापण्यात आलेल्या नोटांचा प्रवास नाशिककरांना जवळून अनुभवता येणार आहे. छापलेल्या
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्यावतीने जुन्या नोटांचे प्रदर्शन आयोजन ८ ते ११ जून दरम्यान करण्यात आले आहे. या संपूर्ण कालावधीत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.अशा प्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन असून नागरिककरासाठी सार्वजनिक स्वरूपातील हा पहिलाच कार्यक्रम असल्याने नाशिककरांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.