By चैतन्य गायकवाड |
अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांची प्रमुख भूमिका असलेला ‘भूल भुलैय्या २’ (bhool bhulaiyaa 2) या चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालत आहे. २० मे रोजी प्रदर्शित झालेला कार्तिक-कियाराचा ‘भूल भुलैया २’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट (Superhit) ठरला आहे. या चित्रपटाची ओपनिंगदेखील चांगली झाली होती. बॉक्स ऑफिस कलेक्शन (box office collection) बघता हॉरर-कॉमेडी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. चित्रपटाच्या या यशानंतर निर्माते (producers) भूषण कुमार आणि मुराद खेतानी यांनी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची देखील निर्मिती करण्याचे ठरवले असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट (twitter account) वरून एक ट्विट (tweet) केले आहे. ज्यात त्यांनी या चित्रपटाच्या कमाई विषयी माहिती दिली आहे. या माहितीनुसार, हा चित्रपट पाचव्या आठवड्यातही चांगली कमाई करत आहे. ‘भूल भुलैया २’ ने रिलीजच्या पाचव्या आठवड्याच्या वीकेंडला (weekend) शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी अनुक्रमे १.१५ कोटी, २.०२ कोटी आणि २.५१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशा प्रकारे चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर एकूण कमाई १८१.८२ कोटींवर पोहोचली आहे. अजूनही चित्रपटाला प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईत आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चित्रपटाच्या चांगल्या कमाईने हा चित्रपट कार्तिक आर्यनचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) यांचा २००७ साली प्रदर्शित झालेला ‘भूल भुलैय्या’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, राजपाल यादव, अमिषा पटेल आणि शायनी आहुजा मुख्य भूमिकेत होते. याच चित्रपटाचा ‘भूल भुलैय्या २’ हा सिक्वेल आहे. ‘भूल भुलैय्या २’ या चित्रपटात संजय मिश्रा, अश्विनी कळसेकर, राजपाल यादव तसेच तब्बूची देखील महत्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि नुरड खेतानी यांनी केली असून, अनीस बज्मी यांनी दिग्दर्शन केले आहे.