नाशिक | शरद चंद्र पवार मार्केट यार्डातील दुकान फोडून तेलाचे डबे पळविणाऱ्या संशयितास पंचवटी पोलिसांनी ठाणे येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण चार लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
नाशिकच्या पेठ रोड वरील शरद चंद्र पवार मार्केट यार्डातील किराणा दुकानाचे शटर तोडून विविध कंपन्यांचे किलो आणि लिटर मधील तेलाचे डबे तसेच तेलाचे बॉक्स आणि साबुदाण्याचे कट्टे असा एकूण चार लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती याबाबतचे पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती . या चोरी प्रकरणी पोलिसांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज आढळून आल्याने. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद नंबर नसलेला टेम्पो आढळल्याने टेम्पो च्या आधारे शहरात येणाऱ्या सर्व व मार्गांवर तपास केला .
या तपासात घोटी टोल नाक्यावर या वाहनांची माहिती मिळाली त्यानंतर ते संशयित वाहन मुंबईच्या दिशेने गेले असून ठाणे येथील असल्याचे समजले . त्यानंतर ठाण्यात तपास करून ठाणे पोलिसांच्या मदतीने मीरा रोड येथून संशयितासह टेम्पो ताब्यात घेण्यात आला या वेळी संशयित आरोपी महाविर कुमावत ( 34 रूम न. 302 चंद्रा ॲकॉर्ड बिल्डिंग सिल्व्हर पार्क मिरा रोड ) याने व त्यांच्या दोन साथीदारांनी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी संशियतांकडून चोरीचा माल विक्रीतून मिळालेली दोन लाख 95 हजार रुपयांची रक्कम आणि 13 हजार रुपये किमतीचे तेलाचे डबे तसेच चोरी करण्यासाठी वापरलेल्या टाटा कंपनीची चार लाख रुपयांचा चार चाकी गाडी असा एकूण सात लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी हा घरफोडीत सराईत असून त्याला पोलिसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे .नाशिक शहरात घडलेल्या घरफोडीच्या अनुषघाने त्याच्याकडे तपास चालू असून शहरातील इतर घरफोडी उघडकीस येण्याची श्यकता असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
संशयित आरोपी वर 29 ठिकाणी गुन्हे दाखल
पंचवटी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांवर पोलीस तपासात मुंबई गुजरातसह 29 ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे . पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित घरफोडीच्या गुन्ह्यात सराईत असल्याचे देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. कांदिवली, नवघर, कस्तुरबा मार्ग , तुळीज , माणिकपूर वसई दिंडोशी काशिमिरा चारकोप मिरा रोड गुहागर दहिसर चीपळून चितळसर भाईंदर. मुंबई एमआयडीसी पोलीस ठाणे गुजरात मधील पांडेसर आणि जुनागढ अशा 29 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.