चैतन्य गायकवाड |
लखनऊ : अक्षय कुमारचा बहुचर्चित आगामी ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Pruthviraj) हा चित्रपट (movie) ३ जून रोजी देशभरात प्रदर्शित (release) होणार आहे. हिंदी (Hindi), तामिळ (Tamil), तेलुगु (Telugu) या भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात हा चित्रपट करमुक्त (tax free) करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (Chief Minister) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी ट्विट (tweet) करून या संदर्भात माहिती दिली आहे.
या चित्रपटात अक्षय कुमारने (Akshay Kumar) सम्राट पृथ्वीराज यांची भूमिका केली आहे. तर मिस वर्ल्ड (Miss World) मानुषी छिल्लरने (Manushi Chhillar) सम्राट पृथ्वीराज यांची पत्नी महाराणी संयोगिताची भूमिका केली आहे. या चित्रपटात संजय दत्त (Sanjay Datt), सोनू सूद (Sonu Sud), आशुतोष राणा (Ashutosh Rana) हे कलाकार सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मानुषी छिल्लर या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन (director) चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे.
दरम्यान, हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राजपूत करणी सेनेने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला होता. चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी केली होती. अन्यथा चित्रपट राजस्थानात (Rajasthan) प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, अशा इशारा करणी सेनेने दिला होता. त्यानंतर २७ मे रोजी, ‘पृथ्वीराज’चे निर्माते यशराज फिल्मस् (Yashraj films) यांनी राजपूत समाजाच्या भावना आणि मागणी लक्षात घेऊन चित्रपटाचे नाव बदलून ‘सम्राट पृथ्वीराज’ असे केले.
आता, या चित्रपटावर काही इस्लामिक देशांनी बंदी घातल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाला ओमान (Oman) आणि कुवैत (Kuwait) येथे बंदी घातल्याची माहिती आली आहे. दरम्यान, या बाबतीत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
‘सम्राट पृथ्वीराज’ हा अक्षय कुमारचा बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटाकडून अक्षयला मोठ्या अपेक्षा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करतो, हे बघणे उत्सुकतेचे असेल. अक्षय कुमारच्या या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांचा ‘विक्रम’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याच बरोबर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर अधारोत ‘मेजर’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. हे सर्व चित्रपट एकाच दिवशी म्हणजे ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. आता बॉक्स ऑफिस वर कोणाची जादू चालते, हे पाहावे लागेल.