नांदेड | येथील बहूचर्चित बाधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांड (Massacre)प्रकरणी सहा संशियत आरोपींना तब्बल ५५ दिवसानंतर अटक करण्यात आले आहे.नांदेड (Nanded) परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आज पत्रकार परिषद (Press conference) घेऊन या बाबत ची माहिती दिली आहे.गेल्या पाच एप्रिल रोजी संजय बियाणी यांची दोन मारेकऱ्यानी गोळ्या झाडून हत्या केली होती . बियाणी यांच्या हत्येने संपूर्ण नांदेड हादरून गेले होते त्यानंतर हत्येमुळे विविध प्रकारच्या चर्चा देखील रंगायला लागल्या होत्या तब्बल दोन महिन्याच्या तपासानंतर पोलिसांनी या हत्येच्या छडा लावला आहे.
खंडणी (Ransom)आणि दहशत पसरवण्यासाठी आरोपीनी ही हत्या केल्याचे सांगण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे .या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग आहे तसेच बियाणींवर गोळीबार (Firing) करणारे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत खंडणीसाठीच बियाणींची हत्या झाल्याचा पोलिसांचा निष्कर्ष आहे. दरम्यान सहाही आरोपींना न्यायालयाने दहा दिवसाची पोलीस कोठडी ( Police cell)सुनावली आहे. अशी माहिती ही तांबोळी यांनी दिली. ६० जणांच्या टीमने हि कामगिरी केल्याची माहिती देखील दली आहे .
संजय बियाणी हत्येचं पाकिस्तान कनेक्शन !
या हत्येमागे पाकिस्तानात (Pakistan )असलेला खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याचा हात आहे पंजाब, दिल्ली, ( Delhi) हरियाणा,उत्तर प्रदेश, , तेलंगणा, आणि कर्नाटक (Karnataka) या सहा राज्यात आरोपींचा शोध घेण्यात आला पकडण्यात आलेले इंदरपालसिंग उर्फे सनी मेजर, मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे, सतनामसिंग उर्फ सत्ता शेरगिल , हरदिपसिंग उर्फ सोनू बाजवा,गुरुमुखसिंग गिल, करणजितसिंघ साहू असे पकडण्यात आलेल्या संशियत आरोपींचे नावे आहेत. सर्व आरोपी हे मुळचे नांदेडचे असल्याची माहितीही तांबोळी यांनी दिली.
हरविंदर सिंघ रिंधा याच्या गुंडांनी खंडणीसाठी दिली होती धमकी
संजय बियाणी नायगाव तालुक्यातील कोलंबी गावचे रहिवाशी होते. 10 वर्षापूर्वी संजय बियाणी नांदेडला स्थायिक झाले.सुरुवातीला त्यांनी स्थानिक केबल (cebal ) नेटवर्कमध्ये जाहिरात एजन्सी ( Agency ) चालवली. नंतर त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच ते नांदेड मध्ये मोठे व्यावसायिक झाले होते. तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंघ रिंधा याच्या गुंडांनी खंडणीसाठी धमकी दिली होती.
बियाणींची पोलिसांनी काढली सुरक्षा
संजय बियाणी यांच्या सह नांदेडमधील अनेक व्यापारी (Merchant )आणि उद्योजकांना खंडणी साठी धमक्या येत होत्या तेव्हा पोलिसांनी मोठे बांधकाम व्यावसायिक असलेल्या संजय बियाणी यांना सुरक्षा देखील दिली होती. नंतरच्या काळात रिंधा गंगची दहशत संपली. मागच्या डिसेंबरमध्ये पोलीस विभागाने संजय बियाणी यांचा सुरक्षा रक्षक (Security) काढून घेतला होता.