सोशल मिडीयावर वरून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत सोशल मिडीयावरील मैत्री हि महागात पडू शकते याचे देखील अनेक उदाहरणे आहेत सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढले आहे . आणि आता तर हद्दच झाली आहे . गुजरातमधल्या एका तरुणाने 21 हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . या तरुणाला मुंबई पोलिसांनी गुजरात मधून ताब्यात घेतले आहे.
प्रशांत आदित्य असे अटक केलेल्या 19 वर्षीय तरुणाचे नाव आहे . तो गुजरातच्या गांधीनगरमध्ये बसून देशातील अनेक भागातील महिलांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळत होता. महिलांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील छायाचित्रांचा वापर करून अश्लील क्लिप बनवायचा नंतर ती क्लिप डिलीट करण्यासाठी तो महिलांकडून पैसे उकळत असे. इन्स्टाग्रामवरुन महिलांचे फोटो आणि व्हिडीओ चोरुन त्यावर अश्लील किंवा पॉर्न फिल्मचा ऑडिओ क्लिप एडिट करुन व्हिडीओ बनवत होता. नंतर त्याच महिलांना तो ब्लॅकमेल करत होता. 500 आणि 1000 रुपयांसाठी तो महिलांना ब्लॅकमेल करत होता.
प्रशांत आदित्य इन्स्टाग्रामवर कम्युनिटीमध्ये अॅड होता. इन्स्टाग्रामवर या कम्युनिटीमध्ये ज्या महिलांचे फोटो असायचे त्याच्या बॅकग्राऊंडला प्रशांत पॉर्न फिल्मचा साऊंडवर लावायचा मग त्या महिलांना हा व्हिडीओ किंवा फोटो पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देयायचं व्हिडीओ व्हायरल करु नये यासाठी तो महिलांकडून 500 ते 1000, 5000 रुपयांची मागणी करायचा अशाप्रकारे तो अनेक महिलांना ब्लॅकमेल करायला प्रशांत आदित्य हा दहावी नापास आहे.