त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगावरील ‘बर्फाचे’ खळबळजनक सत्य आले समोर

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात असलेल्या ज्योतिर्लिंगाभोवती बर्फाचा गोळा आढळून आल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्या व्हिडिओची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा झाली होती. भाविक भक्त अमरनाथ बाबाचा आशिर्वाद या भावनेने या घटनेकडे पाहत होते. दरम्यान आता या व्हिडिओ मागील सत्य आता समोर आले आहे आणि हे सत्य अत्यंत खळबळजनक आहे.

याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या तीन पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती आणि चौकशीनंतर हा बर्फ काही पुजाऱ्यांनीच हा बर्फ येथे आणून टाकल्याचे उघड झाले आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर नगरीत त्यासोबतच भाविक संताप व्यक्त करत आहेत. प्रकरणाच्या चौकशीनंतर भाविकांच्या भावनेशी खेळ करणाऱ्या तीन पुजाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरंतर त्र्यंबकेश्वर येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगा भोवती बर्फाचा गोळा आढळून आला असल्याची बाब समोर आली होती आणि तेथील काही पुजाऱ्यांनी ही अमरनाथ बाबाची भेट असल्याचं सांगत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या घटनेला आठ ते नऊ महिने उलटून गेले आहे. ३० जून २०२२ रोजी ही घटना समोर आली होती. दरम्यान या घटनेमागील सत्य समोर आले आहे. हे सत्य उघडकीस आल्याने एकाच खळबळ उडाली आहे आणि संताप देखील व्यक्त करण्यात येत आहे.

हा व्हिडिओ समोर आला असता तो खोटा असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. चौकशी अंती हा दावा खरा ठरला असल्याचे समोर येत आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तीन पुजाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाभोवती अमरनाथ प्रमाणे बर्फ झाल्याचे सांगत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची जोरदार चर्चा समाज माध्यमांवर झाली होती.

हा व्हिडिओ समोर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यानुसार सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली त्यात एका पुजाऱ्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हा बर्फाचा गोळा शिवपिंडीभोवती आणून ठेवल्याचे तपासात समोर आले. सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. त्यामुळे .दूध का दूध, बर्फाचा बर्फ’ झाला आहे.

खरंतर अमरनाथ आणि त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणांची वातावरणाची परिस्थिती अत्यंत भिन्न आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील हवामान पाहता असं काही होणं अशक्य असल्याचं वर्तवले जात होतं. त्यामुळे संशय दाट होत होता. हा संशय अखेर खरा ठरला आहे.