Video : ओढाजवळ बर्निंग कारचा थरार, सुदैवाने जिवीतहानी टळली

नाशिक | प्रतिनिधी

औरंगाबाद रोडवरील ओढा गावाजवळ भर दुपारी बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

ओढा गावाजवळील पेट्रोल पंपा समोरच चालत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ओढा गावाजवळून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. कारमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने कार रस्त्याच्या कडेला घेतली. प्रसंगावधान राखत चालकसह इतरांनी कारमधून बाहेर पडत सुरक्षितस्थळी गेले.

दरम्यान काही वेळातच या आगीत कार जळून खाक झाली. घटनास्थळी स्थानिकांकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर अद्याप याबाबत सविस्तर माहिती मिळाली नाही.