कोरोना आणि इबोलापेक्षाही आहे खतरनाक हा व्हायरस

जगात आणखी एका नवीन धोकादायक व्हायरस आला आहे. या व्हायरसच प्रकरणं समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्वांना अलर्ट केलं आहे. जगात अजूनही कोरोना व्हायरसचा धोका पूर्णतः संपुष्टात आलेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याप्रमाणात कमी झाला असला तरी धोका हा कायमच आहे . कोरोना व्हायरस संपायचं नाव घेत नसून अनेक देशांमध्ये प्रकरणं वाढताना दिसत आहे .त्यासोबतच व्हायरसचे नवीन व्हेरिएंटही. देखील समोर येत आहेत.आता आणखी एक खूप धोकादायक व्हायरस आला आहे आणि या व्हायरसचे नाव मारबर्ग आहे. मारबर्ग व्हायरस हा सर्वात धोकादायक व्हायरस असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम आफ्रिकी देश घानामध्ये मारबर्ग व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. या व्हायरसची प्रकरणं समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्वांना अलर्ट केलं आहे. असं मानलं जातं की, जो कोणी या व्हायरसच्या तावडीत येईल, त्याचा मृत्यू जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता आणखी एका नवीन व्हायरस न जगाची डोकेदुखी वाढणार आहे.या व्हायरसने आधीच कहर केला आहे. 1967 मध्ये या व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. हा व्हायरस धोकादायक असून त्याचा प्रसार वेगाने होतो. संसर्ग झालेल्यांचा मृत्यू दर 24 टक्क्यांपासून ते 88 टक्क्यांपर्यंत आहे.

एवढेच नव्हे तर या मारबर्ग व्हायरस इबोला आणि कोरोना सारखाच असून जो माणसं बरोबरच जनावरांमध्ये देखील पसरू शकतो असे आरोग्य तज्ञांचे म्हणणे देखील आहे.आणि मारबर्ग व्हायरसचा वाहक वटवाघुळ आहे या प्राणघातक व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका 24 ते 88% पर्यंत असतो हा धोकादायक विषाणू यापूर्वी दक्षिण आफ्रिका अंगोला युगांडा केनिया आणि काँगो प्रजासत्ताक येथे आढळून आला आहे .भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी महासंचालक नेमके गांगुली यांनी दिलेल्या माहितीनुसार मारबर्ग व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो त्याची लक्षणे फ्लूसारखी असतात. तर यासाठी कुठलीही अँटी व्हायरल औषध किंवा लस उपलब्ध नाहीत