शनिवार, जून 3, 2023
घरताज्या बातम्यापुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग मोकळा

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग मोकळा

नाशिक : पुणे-नाशिक हायस्पीड या रेल्वे (Pune-Nashik High Speed ​​Rail Project) प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून रविवारी या प्रकल्प हिरवा कंदील दाखवण्यात आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती आणि हा प्रकल्प सादर केला होता. त्यानंतर या आराखड्याला तत्वतः मंजुरी मिळाली आहे.

रेल्वे विभाग या प्रकल्पाची तांत्रिक तपासणी करणार आहे. रेल्वे विभागाकडून (Ministry of Railways) नेमण्यात आलेल्या एका पथकाकडून ही तपासणी करण्यात येईल. या तपासणी अहवालानंतर प्रकल्प मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येईल आणि तिथे त्याला नक्कीच मंजुरी मिळेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.

“पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिल्याबद्दल मी मा. केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी यांचा अतिशय आभारी आहे. या प्रकल्पामुळे या दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल.” – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य (ट्वीट).

सर्व प्रक्रिया करून हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी प्रलंबित होता. अखेर या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. दरम्यान याची माहिती देत. या प्रकल्पामुळे नाशिक आणि पुणे या दोन्ही शहरांच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकल्पाची काही खास वैशिष्ट्य :

नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे या प्रकल्पाची काही खास वैशिष्ट्य आहे. त्यानुसार पुणे नाशिक लोहमार्ग २३५ किलोमीटर लांबीचा असणार आहे. रेल्वेचा प्रती तास वेग हा २०० किलोमीटर असेल, प्रकल्पाच्या खर्चात ६०% वित्तीय संस्था आणि २० टक्के राज्य सरकार तर २०% रेल्वे चा वाटा असणार आहे. पुणे आणि नाशिक दरम्यान २४ स्थानकांची आखणी करण्यात येणार आहे. तर पुणे आणि नाशिक हे मोठं अंतर अवघ्या दोन तासांवर येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुणे आणि नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे.

दरम्यान तत्वतः मंजुरी मिळाल्या मुळे बहुप्रतीक्षित पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या थंडावलेल्या कामाला आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक, पुणे आणि नगर या जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प म्हणून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकडे पाहिले जाते. 

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप