IPL सामने पाहण्यासाठी या प्लॅनपेक्षा दुसरा कुठला प्लॅन नाही, Jio, Vi, Airtel या सर्वांकडे अप्रतिम ऑफर्स आहेत

जर तुम्हालाही आयपीएल (IPL) पाहण्याची आवड असेल आणि तुमच्या फोनवर सर्व सामने पाहण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला निश्चितपणे अधिक डेटाची आवश्यकता आहे.

आयपीएल 2023 सुरू झाले आहे, आणि जर ग्राहक त्यांच्या फोनवर सामना पाहत असतील, तर साहजिकच डेटाचा जास्त वापर होणार आहे. अशा परिस्थितीत, बरेच लोक अशा योजना शोधत आहेत ज्यामध्ये जास्तीत जास्त डेटा उपलब्ध असेल, तर टेलिकॉम कंपन्या असे अनेक प्लॅन ऑफर करतात, ज्यामध्ये दररोज 3 जीबी डेटा दिला जातो.

Jio3GB डेटा प्लॅन

सर्वप्रथम, Jio बद्दल बोलू , वापरकर्त्यांना त्याच्या 219 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3GB मिळते. याव्यतिरिक्त, 14 दिवसांसाठी अतिरिक्त 2GB डेटा आणि अमर्यादित व्हॉइस आणि एसएमएसचा लाभ मिळतो.

हेही वाचा: युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ने T20 क्रिकेटमध्ये धमाका, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला

जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा मिळतो. यामध्ये 28 दिवसांसाठी अतिरिक्त 6GB डेटा आणि अमर्यादित व्हॉइस आणि एसएमएसचा लाभ दिला जातो. 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना 3GB डेटा, अतिरिक्त 40GB डेटा आणि 84 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ दिला जातो.

Vodafone Idea 3GB डेटा प्लॅन

Vodafone Idea Rs 359 मध्ये 3GB प्रति दिवस डेटा, Rs 409 मध्ये 3.5GB प्रति दिवस, Rs 475 मध्ये 4GB प्रति दिवस आणि Rs 699 च्या प्लान मध्ये 3GB प्रति दिन डेटा ऑफर करते. सर्व Vi प्लॅन्स डेटा डिलाईट अंतर्गत 2GB अतिरिक्त डेटा, रात्री अमर्यादित डेटा आणि अमर्यादित व्हॉइस आणि SMS फायदे देतात.

Airtel चे 3GB डेटा प्लॅन

एअरटेल 28 दिवस आणि 56 दिवसांच्या वैधतेसह 499 रुपये आणि 699 रुपये असे दोन प्लॅन ऑफर करते. या दोन्ही प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटाचा लाभ दिला जातो. यामध्ये मोफत कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ मिळतो. विशेष बाब म्हणजे एअरटेलच्या या प्लॅन्समध्ये OTT फायदेही मिळतात.