जिल्ह्यात आज या ठिकाणी झाला इतका पाऊस

नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.पावसाने नाशिक जिल्हा सर्वत्र जलमय झाला असून. नाशिक जिल्हाला 11 ते 14 जुलै दरम्यान रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. काल पावसानं बऱ्यापैकी विश्रांती घेतली त्यानंतर आज नाशिक जिल्ह्यात पुन्हा पावसाच्या सतत धारा बरसल्या आहेत.

कालच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा नाशिक मध्ये पावसानं जोर धरला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे 100 मिलिमीटर का पाऊस झाला आहे तर इगतपुरी जवळील टाकेद येथे 5.0 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. इगतपुरीत सर्वात जास्त पाऊस झाला आहे. घोटी येथे 57.0 मिलिमीटर इतका तर धरगाव येथे 51.0 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे . याबरोबरच वाडीवर येते 26.0 मिलिमीटर नांदगाव येथे 18.0 मिलिमीटर पेठ येथे 90 मिलिमीटर आणि त्र्यंबकेश्वर येथे 55 मिलिमीटर इतक्या प्रमाणात पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे.


इगतपुरी नंतर पेठ मध्ये ही चांगल्या प्रमाणात आज पाऊस झाल्याची नोंद आहे इगतपुरी 90 मिलिमीटर इतका पाऊस आज कोसळला 11 ते 14 जुलै दरम्यान नाशिकला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर. पाऊस वाढल्यास पुराच्या अनुषंगाने व अति पावसाने जनजीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी देखील घेतली जात आहे. प्रशासनाच्या सर्व यंत्रणा या सज्ज झाल्या आहेत