मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील हे पूल आणि रस्ते पाण्याखाली

नाशिक शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून संपूर्ण नाशिक जिल्हा जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्या बरोबर जिल्ह्यातील काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तर अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. दिंडोरी तालुक्यात सहा ते सात रस्ते पाण्याखाली गेले आहेत तर त्र्यंबकेश्वर देवळा आणि निफाड तालुक्यात प्रत्येकी एक फुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील बरेचसे नव्यांवरील पुल पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

नाशिक मध्ये सलग चार ते पाच दिवसांपासून चालू असलेल्या सतत धारांमुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात देखील झपाट्यानं मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिक शहरावर काही दिवसांपूर्वी पाणी कपातीची टांगती तलवार होती परंतु आता धरण्यातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून .नदीला देखील पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.असून नदीकाठच्या व्यवसायिकांना व रहिवाशांना जिल्हा प्रशासनाकडून व पालिका प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



जिल्हाभरात असलेल्या धरणातील पाणीसाठ्यात वाढदिसून येत आहे आणि पाण्याचा विसर्ग केला जात आहे . दारणा धरणातून 15,088 क्युसेक,ने तर गंगापूर धरणातून 10.000 क्युसेक,कडवा धरणातून 6.712 क्युसेक, नांदूरमध्यमेश्वर धरणातून 41.613 क्युसेक आणि होळकर ब्रिज येथून 11.210 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तर सोमेश्वर धबधबा देखील तुडुंब भरून वाहत असल्याने त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या हेतूने पोलीस प्रशासन देखील तैनात करण्यात आले आहेत.