ओडिशातील नवरंगपूर जिल्ह्यात एका शाळेत झालेल्या चोरीची जोरदार चर्चा सुरू आहे. या धूम स्टाईल केलेल्या चोरीच्या घटनेला सर्वत्र उधाण फुटले आहे.या चोरांनी शाळेत चोरी करून पोलिसांना निरोप लिहिला आहे.त्यामुळे या चोरांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
नवरंगपुरच्या एका इंद्रावती शाळेत ही धूम स्टाईलने चोरी झाली आहे. शाळेतून संगणक,झेरॉक्स मशीन ,प्रिंटर व इतर शाळेसाठी उपयोगी असलेल्या मौल्यवान वस्तू चोरल्याचे आढळून आले आहे.या शाळेतच चोरीच्या आदल्या दिवशी दोन शिक्षकांचा निरोप समारंभ झाला होता या निरोप समरंभा साठी संगीताशी संबधित काही वस्तू आणण्यात आल्या होत्या त्यादेखील चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.
मात्र चोरांनी शाळेत डल्ला जरी मारला असला तरी शाळेतील फळ्याचा चोरी करताना उपयोग केला आहे. त्यावर इट्स मी धूम- 4 असे लिहिले आहे. आम्ही परत येऊ आम्हाला पकडुन दाखवा असा संदेश त्या शाळेच्या वर्गात लिहीलेला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्या संदेशा मुळे सर्वांनाच धूम चित्रपटाची आठवण झाली आहे .इट्स मी धूम 4 असे चोरांनी लिहून शाळेत चोरी केल्याने पोलिसांन आव्हान दिले असून पोलिसांकडून त्या चोरांना पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे.
त्यामुळे आता चोर कितीही हुशार असलं तरी तो पोलिसांपासून वाचू शकत नाही चोरांचा पोलीस तपास करीत असून लवकरच गजाआड करू असे पोलिसांनी सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याबरोबरच पोलीस चोरांना शोधून शाळेतील फळ्यावर लिहिलेल्या आव्हानाला उत्तर देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.