छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल झालेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान आता उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर नेते शांत का असा सवाल करत मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांइतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारे दोषी असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उदयनराजे चांगलेच आक्रमक झाल्याचे आता दिसून येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांवर कारवाई झाली नाही. त्यामुळे उदयनराजे आक्रमक झाले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात आज किल्ले रायगड येथे निर्धार शिवसन्मानाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधताना खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. त्यासोबतच त्यांच्या या वादग्रस्त विधानावर गप्प बसलेल्या नेत्यांवरही त्यांनी निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले. प्रत्येक जाती, धर्माचा सन्मान करण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्याच, शिवरायांचा अपमान सुरू असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. राज्यपालांच्या वक्तव्यावर राज्यातील नेते शांत का बसलेत असा सवालही त्यांनी केला.
राज्यपालांवर निष्ण साधताना उदयानाराजे पुढे म्हणतात ‘राज्यामध्ये राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे. राज्यपालाचे नाव घेऊन त्यांना मोठ करायचे नाही. पद मोठं आहे पण व्यक्ती नाही. स्वत: च्या स्वार्थासाठी राजकीय मंडळींकडून त्यावर पांघारून घालण्याचे काम सुरू असून त्यांना लाज वाटली पाहिजे, असा हल्लाबोल उदयनराजे यांनी केला. फक्त शिवाजी महाराज यांचाच नाही तर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हा आपला अपमान आहे, असं वाटत नाही, का असा सवाल त्यांनी केला. देश हा विकृतांच्या तावडीत गेला असल्याचे सांगत त्याची खंत वाटत असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले.