ग्रामपंचायत सदस्यासह तिघांची गोळ्या झाडून हत्या

गर्दीच्या परिसरात तृणमूल नेते आणि त्यांच्या साथीदारांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पश्चिम बंगालमध्ये चांगल्याच प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही हत्या कॅनिंगमध्ये घडली. हल्लेखोरांनी एकूण 3 जणांची हत्या केली आहे. मृतांमध्ये एक ग्रामपंचायत समिती सदस्य असल्याची माहिती मिळाली आहे.

स्वपन माळी असे मृत ग्रामपंचायत सदस्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. कॅनिंग-गोपाळपूर पंचायत सदस्य स्वपन माळी आणि इतर दोघे दुचाकीवरुन जात असताना त्यांच्यावर पाठीमागून आलेल्या अज्ञात चार ते पाच मारेकर्‍यांनी हल्ला केला. त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात गाडीवरील तिघे गंभीर जखमी झालेत. त्यानंतर त्यांना मरण यावे या साठी हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर एवढ्यावरच न थांबता हत्या करून पळून जात असताना हल्लेखोरांनी बॉम्बही फेकले.

कॅनिंग येथील गोपाळपूर ग्रामपंचायती शेजारी गुरुवारी सकाळी रस्त्याच्या कडेला तीन मृतदेह आढळून आले. मृतदेहांमध्ये ग्रामपंचायत सदस्याचाही समावेश असल्याची माहिती आहे. या हत्याकांडाबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी मोठ्या फौजफाट्या सह घटना स्थळी धाव घेतली. परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून या घटनमागे वैयक्तिक वैमनस्य असावे किंव्हा ही राजकीय वादातून कौटुंबिक कारणातून हत्या झाली असावी. असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.