नांदगावनजीक क्रूझर अपघातात तिघांचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी

मजुरांनी घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार झाल्याची घटना नांदगावनजीक घडली आहे. बुधवारी (दि.०१) रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा येथील मजूर कामानिमित्त मनमाड येथे गेलेले होते. कामावरून घरी परतत असतांना नांदगाव रस्त्याजवळ भरधाव वेगात असलेली क्रूझर (एमएच १३ एसी ५६०४) रस्त्यावर घसरली. यात क्रूझर रस्त्यांवर अनेकदा आदळल्याने गाडीचा चेंदामेंदा झाला.

या अपघातात गाडीतील तिघेजण जागीच ठार झाले तर इतर मजूर गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.