नाशकात बिबट्यांचा थरार! एकीकडे घातली कुत्र्यावर झडप तर दुसरीकडे 60 फूट झाडावर धुमाकूळ

नाशकात बिबट्यांचा वावर वाढत चालला असून या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक आतापर्यंत जखमी झाले आहेत तर काही मृत्युमुखी देखील पडले आहेत. मानवी भागांमध्ये बिबट्याचा वावर वाढला असून एक झाली कि एक घटना धडकतच आहे. त्यामुळे नागरिक देखील भयभीत झाले असून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. नाशकात बिबट्याचा २ घटना समोर आल्या आहेत. त्यात चक्क 50 ते 60 फूट झाडावर चढलेले आणि तेथेच धुमाकूळ घालताना प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून याची चांगलीच चर्चा होतेय.

सिन्नरमधील सांगवीतील घटना

बिबट्यांना चक्क 50 ते 60 फूट झाडावर चढलेले आणि तेथेच धुमाकूळ घालताना प्रकार बहुदा कुणी पाहिला नसावा. पण नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सांगवी येथे दोन बिबटे चक्क नारळाच्या झाडावर दिसून आले. झाडावर सुमारे पन्नास ते साठ फुट उंचीवर त्यांनी एकमेकांवर डरकाळ्या फोडत आव्हानही दिले. हा व्हिडीओ आता मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यांना तत्काळ पकडावे अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.

पहा व्हिडिओ

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सांगवी येथे दोन बिबटे चक्क नारळाच्या झाडावर दिसून आले.


देवळाली गावात बिबट्याने घातली कुत्र्यावर झडप

नाशिकच्या देवळाली परिसरात बिबट्याचा पुन्हा मुक्त संचार आढळून आला आहे. एवढेच नाही तर परिसरातील एका बंगल्यात प्रवेश करत कुत्र्यावर झडप घालत कुत्र्याला उचलून नेले, हा सर्व प्रकार CCTV कॅमेरामध्ये कैद झाला असून यामुळे नागरिक आता चांगलेच धास्तावले आहेत. पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची स्थानिक नागरिकांची मागणी केली आहे. बिबट्याने कुत्र्याला त्याचा जबड्यात पकडून नेत असतानाचा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ