नाशिक: येथील दुगारवाडी धबधब्यावर जवळपास २० हुन अधिक पर्यटक अचानक वाढलेल्या पाणीपातळीमुळे अडकले होते, त्यांना रात्री उशिरा पर्यंत रेस्क्यू करण्याची कारवाई सुरू होती त्यातून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले मात्र त्यातला एक पर्यटक वाहून गेला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
काल (दि.७) रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर परिसरातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यास सरासरी २२ तरुण दुगारवाडी येथे गेले, मात्र सायंकाळी जोरदार मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अचानक पाणीपातळीत वाढ झाली आणि पाणी प्रवाह देखील वाढला त्यामुळे हे सर्व पर्यटक डोंगराच्या कपारीजवळ जिथे पाण्याचा अतिवेगाने होणाऱ्या प्रवाह जवळच अडकले.
दुगारवाडीत पर्यटक अडकल्याची माहिती मिळताक्षणी मध्यरात्री बचाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, नाशिक क्लाइंबर अँड रेस्क्यू असोसिएशन, वन विभाग, महसूल व पोलीस प्रशासन यांच्या खडतर प्रयत्नानंतर मध्यरात्री दीड-दोन च्या सुमारास या पर्यटकांना सुखरूप वाचवण्यात यश आले. पर्यटक अडकले होते ते ठिकाण डोंगराच्या कापरिच होत आणि बाजूलाच पाण्याचा अतिवेगाने होणार प्रवाह असल्यामुळे रेस्क्यूला अडथळे येत होते. मात्र बचाव पथकाने शेवटी मोहीम फत्ते केली. तसेच एक पर्यटक वाहून गेला असून अविनाश गरड,रा.आंबेजोगाई, जिल्हा. बीड असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सकाळपासून पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.