रामरायाला तब्बल ३२ हात पांढराशुभ्र फेटा..वाचा काळाराम मंदिरातील ही अनोखी परंपरा

नाशिक : आज आमलकी एकादशी निमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामरायाला तब्बल ३२ हात पांढराशुभ्र फेटा बांधला गेला. या सोहळ्याला पाटोत्सव असे म्हंटले जाते. आज आमलकी एकादशी निमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात हा सोहळा संपन्न झाला. ही परंपरा पुजारी घराण्यातील २७ पिढिच्या वारश्यांच्या कडून गेली अनेक शतके अखंड पालन केली जात आहे.

विश्वस्त धनंजय पुजारी, श्रीमहंत सुधीरदास महाराज निनाद पुजारी दिपक कुलकर्णी यांनी आज हा विधी संपन्न केला. सचिन संदिप पुजारी प्रदिप वाघमारे उपस्थित होते. दरम्यान पांढऱ्या वस्त्रांमध्ये रामरायाचे दर्शन पुण्यकारक असल्याचे म्हंटले जाते.

काय आहे पाटोस्तव..?

देवकलाह्लास निवृत्ती पूर्वक देवकला अभिवृद्धी साठी देवतांच्या मस्तकावर पट्टबन्ध बांधने याला पाटोस्तव असे म्हंटले जाते. प्रतिष्ठामहोददी व प्रतिष्ठामौक्तिकम् या प्राचिन ग्रंथात याचे महत्व सांगण्यात आले आहे. ३२ ही संख्या अनुष्टुप छंदा चे रुप आहे वेदातील पुरुषसुक्त रामरक्षा पवमानसुक्तांतील बहुतांशी ऋचा याच छंदात आल्या आहे. चारही वेदातील स्तुती मंत्र अनुष्टुपछंदात आहे. या छंदातील स्तुती ने प्राणरुपी देवता प्रसन्न होतात, म्हणून देवतांना देखील या छंदातील स्तुती आवडते.

काय आहे पाटोस्तवाचे वैशिष्ट्य..?

फेटा नेसवायच्या आधी रामरायाला १६ पुरुषसुक्ता व्दारे महापुजा संपन्न केली जाते. त्यानंतर विधीपूर्वक प्रथम श्वेतवस्त्र झगा पोशाख सीता मातेला साडी चोळी नेसवुन मग श्री रामांना प्रथम फेटा बांधायला सुरवात करतात. या सर्व कार्याला तब्बल दोन तास लागतात. ही परंपरा पुजारी घराण्यातील २७ पिढिच्या वारश्यांच्या कडून गेली अनेक शतके अखंड पालन केली जात आहे. श्वेतवस्त्रातील रामरायाचे दर्शन मोठे पुण्याकारक सांगितलं आहे. येरवी ११ महिन्याला सर्व एकादशीला रामरायांना पितांबर नेसवलेले असते फक्त हा फाल्गुन मास असा असतो की ज्यामध्ये हे पांढरे वस्त्र नेसवले जाते. पांढरा रंग उष्णता परावर्तित करतो. अशात उन्हाळ्याच्या त्रास होऊ नये म्हणून पांढरे वस्त्र रामरायांना नेसवले जातात.

रंगपंचमी बद्दलही देण्यात आली माहिती..

रंगपंचमीच्या दिवशी केशर व पळसाचा फुलांचा रंग उकळून त्याचा रंग आगामी येणाऱ्या वासंतिक नवरात्राचे यावर्षीचे उत्सवाचे मानकरी समीरबुवा पुजारी यांच्या शुभहस्ते रामरायांना श्रीखंडाचा नैवेद्य श्वेत वस्त्रावर रंग व गुलाल टाकल्यावर नाशिककरांची रंगपंचमी रहाड उत्सव सुरु होईल. अशी माहिती देण्यात आली आहे.