नूतन महाविद्यालयात लो. टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊसाठे जयंती साजरी

1ऑगस्ट रोजी येथील ‘महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित’ नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. चव्हाण प्रभाकर यांच्या हस्ते सुरुवातीला महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी इतिहासाच्या प्राध्यापिका ज्योती माळी यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे जीवनाचरित्र सांगितले. त्यानंतर वक्तृत्वस्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी 12 स्पर्धेक विदयार्थ्यांनी सहभाग घेऊन स्पर्धा वाढवली. सदर स्पर्धेत कौशल्य देशमुख प्रथम, जयश्री पवार द्वितीय, तर संगीता फुफाने तृतीय या विद्यार्थीनींची निवड करून अध्यक्षाच्या हस्ते गौरवण्यात आले.

तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती समन्वयक मा.डॉ.अपूर्वभाऊ हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील गरीब, गरजू व अनाथ विदयार्थ्यांसाठी समाजाभिमुख अशी अपूर्व दत्तक योजना निमित्त होतकरू विदयार्थ्यांना शाखेतर्फ शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भोये भगवान तर आभार श्रीमती वाघ मीनल यांनी मांडले.यावेळी पर्यवेक्षक श्री. बच्छाव, प्रा.जाधव बी.आर, प्रा.चव्हाण पी.ए, प्रा.थविल, प्रा.देसले व विदयालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.