नाशिक : त्रंबकेश्वरमध्ये सकल हिंदू मोर्चा (A Hindu march was held in Trimbakeshwar) काढण्यात आला. आता एकाही श्रद्धाचा बळी जायला नको यासाठी त्र्यंबकेश्वर वासी रस्त्यावर उतरले होते. श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात आंदोलने (Protests across the state after the brutal murder of Shraddha Walkar) होत आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरात हिंदू संघटनाकडून विराट मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आज त्र्यंबकेश्वरमध्ये सकल हिंदू मोर्चा काढण्यात आला. श्रद्धा वालकर निर्घृण हत्या प्रकरणी निषेध करत लव्ह जिहादला प्रतिबंध करण्याच्या मागणीसाठी त्र्यंबकेश्वरवासीय रस्त्यावर उतरले होते. या मोर्चामध्ये पुरोहित संघ, साधू महंत यांचा देखील सहभाग होता.
लव जिहाद, गो वंश हत्या बंदी, धर्मांतर बंदी (Love Jihad) कायदा लागू करण्यासाठी आज (March against ‘Love Jihad’ in Trimbakeshwar) हिंदू समाज विराट मोर्चाच्या माध्यमातून एकवटला आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधात कायदा करून देशभरात तो कायदा लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज नाशिक नंतर आज त्र्यंबकेश्वरमध्ये सकल हिंदू मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
लव्ह जिहाद विरोधात आणि धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशात लागू करावा(Law against Love Jihad and Prohibition of Conversion), श्रद्धावालकर हिचा मारेकरी आफताबला फाशी देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरवात झाली. या ठिकाणी शहरातील असंख्य नागरिक एकत्र येत घोषणांनी शहर दणाणून गेले होते. यावेळी ‘लव जिहाद’ विरोधात कायदा करून तो लवकरात लवकर लागू करावा अशा प्रतिक्रिया मोर्चात सहभागी नागरिकांकडून देण्यात आल्या. भगव्या टोप्या, भागवर वस्त्र, हातात मागण्यांचे पोस्टर घेऊन हा मोर्चा शहरातील विविध भागांमधून मार्गक्रमण करत पुढे गेला. लव्ह जिहाद विरोधात आणि धर्मांतर बंदी कायद्यासाठी सर्व समाजबांधव एकवटलेले या ठिकाणी दिसून आले.
काही दिवसांपासून महाराष्ट्रात तापत चाललेला लव जिहादचा मुद्दा त्यातल्या त्यात श्रद्धा वालकर या तरुणीची आफताब पूनावाला नामक युवकाने केलेली थरारक हत्या या सर्व प्रकरणांमुळे हिंदू समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विविध संस्था आणि संघटनांनी एकत्र येत हा मोर्चा पुकारला होता. दरम्यान मोर्चामध्ये पुरोहित संघ, साधू महंत यांचा देखील सहभाग दिसून आला.