नाशिकच्या पर्यटन स्थळांवर जीवघेणी स्टंटबाजी सुरूच..!

नाशिक: जिल्ह्यात ( Nashik District) अतिउत्साही पर्यटकांची नांदूरमधमेश्वर (Nandur Madhyameshwar Dam) धरणावर स्टंटबाजी सुरूच आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणासमोरील पुलावर हौशी पर्यटक जीवाची परवा न करता स्टंटबाजी करताना दिसून येत आहे.

जिल्ह्यात संततधार पाऊस (Heavy Rain in Nashik) सुरू आहे. अशात गोदावरी (Godavri River) आणि दारणा नदीचे (Darna River) पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात आल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रचंड वेगात असलेलं पाणी या ठिकाणी असलेल्या पुलाला येऊन आदळतं. मात्र या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले हौशी पर्यटक उसळलेल्या पाण्यात अंघोळ करताना दिसून येताय. तर काही पर्यटक उसळलेल्या पाण्याच्या परवा न करता या पुलावर मुक्त संचार करताना दिसून येताय.

यापूर्वी देखील नांदूर मधमेश्वर धरणावर अशाप्रकारे स्टंटबाजी करतानाचे पर्यटकांचे व्हिडिओ समोर आले होते. प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊन देखील अशाप्रकारे स्टंटबाजी सुरूच आहे. अशात पाण्यात आत्मघातकी खेळ करतानाचे हे थरारक दृश्य पाहून पुढे चालून काही बरं वाईट झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे निसर्गाने सर्वत्र हिरवी शाल पांघरली आहे. नद्या, धबधबे, धरणक्षेत्र परिसरांत पावसाळी सहलीचा आनंद घेताना पर्यटक दिसत आहेत. निसर्गाचे वरदान असलेल्या नाशिकमध्ये दारणा, भावली, नांदूर मधमेश्वर इत्यादी धरणांच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळांवर बंदी घातल्याने पर्यटकांकडून काहीशी नाराजी व्यक्त होत होती. मात्र, वनविभागाने २३ जुलै रोजी ही बंदी उठवली. त्यानंतर पुन्हा या पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, शासनाकडून वेळोवेळी सूचना देऊनही काही पर्यटन स्थळांवर जीवघेणी स्टंटबाजी करतानाचे धक्कादायक चित्र दिसत आहे.

पहा व्हिडीओ..

https://youtu.be/MrcQKghE8HE