Tractor Accident| ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरचा भीषण अपघात

ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरचा भीषण अपघात झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या रस्त्याने शेतीमाल वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरची संख्या जास्त आहे. अनेकदा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या क्षमतेपेक्षा अधिक भरले जातात. त्यामुळे अपघात होण्याच्या घटना वाढतात. अशीच एक घटना आता समोर येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला आहे. क्षमतेपेक्षा अधिक भरल्याने ट्रक्टरचा भीषण अपघात झाला. अपघाताचा हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. या अपघाताची १९ सेकंदांची क्लिप समोर आळी आहे. १९ सेंकदाचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.

या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. गच्च भरलेल्या सुसाट ट्रॅक्टरचा हुक अचानक तुटतो आणि ट्रक्टर अपघातग्रस्त होतो. यावेळी अपघात पाहणाऱ्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकला अशी स्थिती होती.

ऊस किंवा इतर कोणतीही शेतीमाल वाहतूक असो ही वाहतूक धोकादायक पद्धतीने होताना अनेकदा आपण पहिले असेल. याचा प्रत्यय देणारी ही घटना आहे. तळोदा शहरातील वन विभागाच्या चेक पोस्ट समोर हा प्रकार घडला आहे. तळोदा शहराच्या बायपास रस्त्यावरुन क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर जात होता. ट्रॉलीत वजन जास्त असल्याने ट्रॅक्टरची पुढची दोन चाके हवेत होती. ट्रॅक्टर खाली पडताच हुक तुटला आणि अपघात झाला.

या घटनेत दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. बाजूला कुठलं ही वाहन नसल्याने मनुष्य हानी झाली नाही. मात्र अशा प्रकारे वाहनात क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणे कधी थांबेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.