रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज! तुम्ही पाहिला का?

By चैतन्य गायकवाड |

बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित (most awaited) आणि मल्टीस्टारर (multy starar) चित्रपट म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपट! या बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलर (trailer) आज रिलीज झाला आहे. रणबीर (Ranbeer) आणि आलियाच्या (Aliya) मुख्य भूमिकेतील ‘ब्रह्मास्त्र’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटात व्हीएफएक्सचा (VFX) जबरदस्त वापर करण्यात आल्याचे या ट्रेलरमधून दिसते. याच सोबत या चित्रपटात रणबीर-आलियाच्या रोमँटिक केमिस्ट्रीसोबतच भरपूर अ‍ॅक्शनदेखील पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या आवाजात या ट्रेलरची सुरूवात होते. त्यानंतर हळूहळू रणबीर कपूर आणि आलिया पाहायला मिळत आहे. तब्बल ५ वर्षांच्या बहुप्रतिक्षेनंतर हा चित्रपट पूर्ण झाला असून, त्याची रिलीज डेट देखील जाहीर झाली आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

ब्रम्हास्त्र चित्रपटाचा ट्रेलर

या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटात काहीतरी वेगळ, विलक्षण आणि हटके पहायला मिळणार असल्याचे जाणवते. या चित्रपटात रणबीरने ‘शिवा’ नावाची मुख्य भूमिका साकारली आहे. तर आलियादेखील ईशा नावाच्या मुख्य भूमिकेत आहे. या ट्रेलरमध्ये असे दिसून येते की, रणबीरमध्ये एक अशी शक्ती आहे, जी या जगाला वाईट शक्तींपासून वाचवू शकते. या चित्रपटात रणबीर आणि आलिया यांचा अभिनय कसा असणार आहे, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरने पहिल्यांदाच एकत्र अभिनय केलेला आहे. तसेच लग्नानंतर पहिल्यांदाच ते दोघे एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांची केमिस्ट्री कशी असेल, हे बघण्यासाठी चाहते या चित्रपटाची आतुरतेने वात पाहत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच यातील व्हीएफएक्सच्या वापराबद्दल देखील कौतुक होत आहे.

या ट्रेलरला चाहत्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेक चाहत्यांना या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले व्हिज्यूएल इफेक्ट्स आवडत आहेत. ट्रेलरवरून हा चित्रपट भव्य असेल, याची कल्पना करत येऊ शकते. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनने केली आहे. तर फॉक्स स्टार स्टुडिओ या चित्रपटाचा सहनिर्माता आहे. या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय देखील आहे. तसेच हा चित्रपट हिंदीशिवाय इतर भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.