नाशिक | प्रतिनिधी
नाशिकचे बहुचर्चित पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची अखेर बदली झाली असून यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या दमदार शैलीने नागरिकांना प्रभावित करणारे आयुक्त दीपक पांडेय चर्चेत होते. हेल्मेट सक्ती, भोंग्याबाबतचा निर्णय, तसेच लोकप्रतिनिधींना सडेतोड उत्तरे यामुळे ते प्रसिद्ध होते.
दरम्यान त्यांची आज बदली झाली असून त्यांच्या जागेवर जयंत नाईक नवरे हे नवे पोलीस आयुक्त नाशिक शहराला लाभणार आहेत. दीपक पांडेय यांच्या बदलीमुळे शहरात चर्चाना उधाण आले आहे.