नाशकात आदिवासी विद्यार्थी आक्रमक; ३०० ते ४०० विद्यार्थ्यांची अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात

नाशिक : आदिवासी शाळेतील ३०० ते ४०० विद्यार्थ्यांनी नाशिकमध्ये अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. निकृष्ट जेवणाबद्दल विद्यार्थी आक्रमक झाले असून एकलव्य मॉडर्न रेसिडेंशियल आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा अन्य त्याग आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. त्यानुसार ३०० ते ४०० विद्यार्थ्यांचे सध्या नाशिक मध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु झाले आहे.

निकृष्ट जेवणाबद्दल एकलव्य मॉडर्न रेसिडेंशियल आदिवासी शाळेतील हे सर्व विद्यार्थी नाशिक मध्ये उपोषण करत आहेत. जवळपास तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांचे सकाळपासून उपोषण सुरु आहे. मॉडर्न रेसिडेंशियल आदिवासी शाळेतील निकृष्ट जेवणाबद्दल विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी आहे. मात्र वारंवार तक्रार करूनही जेवण निकृष्ट येत असल्याचा आरोप यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. एवढंच नाही तर जेवणात वारंवार अळी आढळत असल्याचा देखील आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे आणि तशी तक्रार केली असल्याचे देखील म्हंटले आहे.

नाशिकच्या आरटीओ कार्यालय परिसरात मॉडर्न रेसिडेंशियल ही आदिवासी शाळा आहे. दरम्यान या ठिकाणी जेवण निकृष्ट दर्जाचे भेटत आहे. अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. मात्र तक्रार करून देखील निराकरण होत नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. सकाळपासून हे विद्यार्थी नाशिकमध्ये उपोषण करत आहेत. दरम्यान आता याबाबत दखल घेत पाऊले उचलली जातात का हे पाहणे महत्व्हाचे असणार आहे.

नाशिकमध्ये निकृष्ट जेवणाबद्दल आदिवासी शाळेतील विद्यार्थी आक्रमक

एकलव्य मॉडर्न रेसिडेंशियल आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा अन्य त्याग आंदोलन; जेवणात वारंवार अळी आढळत असल्याची तक्रार

थोडक्यात बातमी

-३०० ते ४०० आदिवासी विद्यार्थ्यांचे नाशिक मध्ये अन्नत्याग आंदोलन

-निकृष्ट जेवणाबद्दल विद्यार्थी आक्रमक

-एकलव्य मॉडर्न रेसिडेंशियल आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा अन्य त्याग आंदोलन

-जवळपास तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांचे सकाळपासून उपोषण

-निकृष्ट जेवणाबद्दल विद्यार्थ्यांची तक्रार

-वारंवार तक्रार करूनही जेवण निकृष्ट येत असल्याचा आरोप

-जेवणात वारंवार अळी आढळत असल्याची तक्रार