काश्मीर मध्ये 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक घरात तिरंगा..!

By : Pavan Yeole

नाशिक : मध्ये आज जम्मू काश्मीर चे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक मोठी विधाने केली आहेत. जम्मू काश्मीर मधील आता होणारा विकास तेथील पूर्व परस्थिती सध्यायाची परस्थिती या बाबत त्यांनी माध्यमांना माहिती दिली आहे 370 कलम हटवल्याने जम्मू काश्मीर मध्ये विकास सुरू झाला आहे. जम्मू काश्मीर मध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत . त्यामुळे लवकरच तेथे नवीन सरकार येणार आहे. अशी माहिती कविंदर गुप्ता यांनी दिली आहे . जम्मू काश्मीर मधील पूर्व परस्थिती सांगताना आधीच्या सरकारमध्ये सैन्य दलावर दगडफेक केली जायची आता तेथील दहशतवाद मोडीत काढण्यासाठी सैन्य दलाला फ्रीहँड देण्यात आला आहे. दहशतवादाला उत्तर देण्यासाठी सैन्य दल सक्षम असल्याच देखील त्यांनी सांगितलं आहे.

यासोबतच कवींदर गुप्ता यांनी एक मोठ विधान देखील केलं आहे . 15 ऑगस्ट पर्यंत जम्मू काश्मीर मधील सर्व घरात भारताचा झेंडा फडकेल असे सांगितले असून या अगोदर तिथले लोक झेंडा फडकवायला घाबरायचे अनेक दिवसांपासून लडाख आणि जम्मू मध्ये भेद चालू होता त्या ठिकाणी कायदा सूव्यवस्था नव्हती कलम 370 नंतर आता तेथील नागरिक तिरंगा फडकविणारआहेत , 370 कलमने आपल्याला आतंकवाद ,परिवार वाद दिला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. भारत मातेचे नाव घेणे देखील तेथे गुन्हा समजला जायचा ,आता तिथे लोक तिरंगा फडकवणार असल्याचे काविंदर गुप्ता यांनी सांगितले आहे.

भाजप जे बोलते ते करते असे म्हणत राम मंदिराच्या मुद्द्यावरून देखील अगोदरच्या सरकारवर निशाणा साधला आहे. मंदिर तिथेच बनवून पण तारीख नाही सांगणार असे पहले सरकार होते राम मंदिराला जूमला विरोध करायचे असे म्हणत काँग्रेसवर टीका केली आहे .70 वर्षांनी वाल्मिकी समाजाला न्याय मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे . 2014 नंतर भाजपला 5 हजार मते मिळाली परंतु आता भाजपा कडे साडे चार लाख सदस्य आहेत अशी पण माहिती गुप्ता यांनी दिली आहे . पहिल्यांदाच जम्मू काश्मीर मध्ये जिल्हा परिषद निर्माण झाली आहे. जी- 20 परिषदेचे काही कार्यक्रम देखील जम्मू कश्मीर मध्ये होणार आहेत भाजपा सरकारच्या अनेक योजनांचा लाभ जम्मू-काश्मीरमध्ये होत आहे जम्मू कश्मीर पहिले असे आहे जेथे दोन Allms संस्था होणार आहे . तेथे रस्ते तयार होत आहे. अशी तेथील विकासाबाबत माहिती दिली असून देशातील जनतेने एकदा जम्मू-काश्मीर जवळून अनुभवावे असे जम्मू काश्मीर चे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी आवाहन केले आहे.