त्र्यंबकेश्वर: बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) त्र्यंबकेश्वर (Tryambakeshwar) तालुक्यात असलेल्या धुमोडी (Dhumodi) गावात बिबट्याने (leopard attack) काल सायंकाळच्या सुमारास एका शाळकरी मुलीवर हल्ला चढवला. बिबट्याने जबड्यात धरून मुलीला जंगलात ओढून नेले. सुमारे साडे चार तास वनकर्मचारी व गावकऱ्यांनी परिसर पिंजून काढला असता, रात्री ११ वाजेच्या सुमारास ह्या बालिकेचा मृतदेह आढळला. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडाझुडपांत या बलिकेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या हल्ल्याने गावात घबराट पसरली आहे.

रुचीका वाघ असे या मुलीचे नाव आहे. ही मुलगी आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना, बिबट्याने अचनाक या मुलीवर हल्ला चढवला. बिबट्याने जबड्यात धरून या मुलीला फरफटत नेले. वनकर्मचारी आणि गावकऱ्यांनी शोध घेतला असता, या मुलीचा मृतदेह जंगलात झाडाझुडपांत आढळून आला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. सायंकाळी ६:३० वाजेच्या दरम्यान रुचिका एकनाथ वाघ या १० वर्षीय मुलीचा बिबट्याने बळी घेतला. मुलगी अंगणात खेळत असताना बिबट्याने झडप घालत मुलीला अंधारात ओढून नेले. या मुलीचा मृतदेह स्थानिकांना मिळून आला आहे.

दरम्यान, काल तळवाडे (Talwade) शिवारात देखील बिबट्याने धुमाकूळ घातल्याचे दिसून आले. या परिसरात बिबट्याने तीन बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. दरम्यान, बिबट्याचा या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून त्र्यंबकेश्वर परिसरात मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढलेला दिसत आहे. जंगली प्राण्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडत असतात. मात्र, बिबट्याचा या हल्ल्यात एका चिमुकल्या शाळकरी मुलाचा जीव गेल्याने, शाळकरी मुलांमध्ये तसेच नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.