तुकाराम भोये हे कोकणा आदिवासी समाज गौरव पुरस्काराने सन्मानित

खोकरी जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक तुकाराम भोये यांना कोकणा आदिवासी समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी गुणगौरव, करिअर मार्गदर्शन शिबिर व गुरुवर्य सन्मान सोहळा या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार हरिचंद्र चव्हाण यांच्याहस्ते भोये यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तुकाराम भोये हे एक उपक्रमशील शिक्षक आहेत. मागील अठरा वर्षापासून ते आपल्या शाळेत विविध उपक्रम राबवितात. आदिवासी बहूल भाग असल्यामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. अशात कोविड काळात अनेक पालकांकडे मोबाईल नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी ओट्यावरची शाळा, मंदिरातील शाळा, शिक्षक आपल्या दारी हे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवले.

राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे संस्थापक प्रभाकर महाले, मनोहर टोपले, राज्यअध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष मोतीराम पवार,राज्य सरचिटणीस एस. के. चौधरी, नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे, सुरगाणा तालुका प्रमुख पांडुरंग पवार, तालुका अध्यक्ष उत्तम वाघमारे, तालुका उपाध्यक्ष मनोहर चौधरी, सुरगाणा तालुका सरचिटणीस सुधाकर भोये, पंचायत समिती सभापती मनीषा महाले, उपसभापती, इंद्रजीत गावित, गटविकास अधिकारी दीपक पाटील, गटशिक्षण अधिकारी धनंजय कोळी, केंद्रप्रमुख के.पी.अहिरे, मुख्याध्यापक रमेश धूम सेवानिवृत्त शिक्षक एन.एस.चौधरी, बाळू हरी चौधरी, शिवराम देशमुख, केशव महाले, माधव चौधरी, सिताराम कडवा, राजेंद्र गावित आदींनी भोये यांना अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.