नाशिक | प्रतिनिधी
दिल्ली पोलिसांनी (Police) नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा एक कारवाई करत पिस्तुल आणि काडतूस विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान दोनच दिवसांपू्र्वी दिल्लीत हजारो कोटींचा घोटाळा करून नाशिकमध्ये दडून बसलेल्या ठकसेनाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुन्हा एकदा दिल्ली (Delhi) पोलिसांचा खाकी अंदाज दिसुन आला आहे.
टेकचंद दालचंद खेरी (वय ३०) आणि द्याचंद जयपाल डिलर (वय २५) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. हे दोन तरुण दिल्लीत पिस्तूल आणि काडतुसांची विक्री करत असायचे.याबाबत पोलिसांनी सुगावा लागला होता, त्यामुळे दिल्ली पोलीस या दोघांच्या मागावर होते.
दरम्यान या दोन्ही तरुणांना पोलीस मागे लागल्याची कुणकुण लागताच त्यांनी दिल्लीतून धूम ठोकत थेट नाशिक गाठले. इथे ते दोघे मित्राच्या मदतीने वास्तव्यास होते. मात्र, इथेही त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरूच होता. अखेर आज या दोघांनाही दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे दिल्ली पोलिसांच्या कर्तबगारीचेही कौतुक होत आहे.