गणरायाच्या मिरवणुकीला गालबोट, गोदावरीत दोघेजण वाहून गेले

नाशिक:- गुरुवारी दहा दिवसाच्या लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. सकाळी आकरा वाजल्यापासून नाशिक शहरातील वाकडी बारव येथून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. तब्बल बावीस गणेश मंडळ या मिरवणुकीत सहभागी झाले होते. लाडक्या बाप्पाला निरोप देत असताना मिरवणुकीला गालबोट लागले. गणरायाच्या विसर्जनासाठी गोदावरी नदीत गेलेले दोघेजण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. गेल्या दहा दिवसांपासून नाशिक शहरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात आला. मात्र अखेरच्या दिवशी गणेश गोदावरी नदीत गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले दोघे बुडाल्याने सणाच्या आनंदावर दुःखाची भर पडली आहे.

अखेरच्या दिवशी गणेश उत्सवाला गालबोट लागले नाशिक जिल्ह्यातीलच वालदेवी धरणात तीन जण बुडल्याची माहिती समोर आली आहे. वालदेवी धरणात दोन महाविद्यालयीन युवकांसह एक विवाहित तरुण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच राज्यातील आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांच्या वतीने या तिघांचा कसोशीने शोध सुरू आहे. नाशिक महापालिकेचे जीव रक्षक कर्मचाऱ्यांकडून बुडाल्यांच्या शोध घेण्याचे काम सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या वेळेस बुडालेल्या युवकांबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही .गोदावरी नदीला जास्त प्रमाणात पाणी वाहत असल्याने पाण्यात शोध घेण्याचे प्रशासन आव्हान आहे. नाशिक शहरात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या आनंदाच्या वातावरणात सुरू आसताना शहरातील रामकुंड(ramkund nashik) परिसरातील गाडगेबाबा(gadagebaba bridge) पूलाजवळ दुपारी चार वाजेच्या सुमारास दोन जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. विशेष बाब म्हणजे अशी की, घटना घडलेल्या ठिकाणापासून आगदी हाकेच्या आंतरावर महानगरपालिका उपविभागीय कार्यालय आहे.

घटना घडून तब्बल दोन तास उलटून गेले तरीही महापालिकेकडून आपत्ति व्यवस्थापन संदर्भात कुठल्याही प्रकारची मदत पाठवन्यात आली नाही. ६ वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. तरीही वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध लागला नव्हता.

गणेश चतुर्थी पासून ते आनंत चतुर्थीपर्यंत वेळोवेळी प्रशासनाकडून सूचना दिल्या जातात विसर्जनच्या वेळी नियमावली बनवून कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला जातो. जीवाशी बेतेल असे प्रकार करून नका असे वारंवार आव्हान करून देखील तरुण का असे जीवघेणे प्रकार करता आशा हुल्लडबाजांवर आळा बसणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.