नाशिक शहरात कोयते,तलवार शस्त्रे बाळगणाऱ्यांना अटक.

नाशिक : नाशिकरोड जेलरोड भागातून धारधार शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना नाशिक शहर पोलीस युनिट क्रमांक १(nashik police crime unit 1) च्या पथकाने कार्यवाही करून त्यांच्याकडून तलवार(sword) आणि कोयते जप्त करत दोघं संशयितांना ताब्यात घेतले आहे.


दिनांक २६/०६/२०२२ रोजी नाशिक गुन्हेशाखा युनिट क्र. १ च्या कर्मचारी यांना गुप्त बातमीदारा मार्फत आम्रपाली झोपडपटटी, कॅनाल रोड, येथे दोन इसम यांचे कडे कोयते, तलवार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली होती.त्यानुसार मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा १ च्या पथकाने नाशिक रोड,कॅनल रोड येथील आम्रपाली झोपडपटटी येथे जावून सापळा लावून ऋतीक भगवान गायकवाड, आनंद मुरलीधर धोंगडें या दोघं संशयितांना शिताफीने पकडुन त्यांचे कडुन तीन धारदार कोयते व एक धारदार तलवार जप्त करण्यात आले असून त्यांचे विरुध्द उपनगर पोलीस स्टेशन(upnagar police station) येथे आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे ,पोलीस उप आयुक्त संजय बारकुंड, सहा. पोलीस आयुक्त वसंत मोरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पो. हवा. योगीराज यशवंत गायकवाड, पो. हवा. शरद जनार्दन सोनवणे, पो. हवा. प्रदिप चंद्रकांत म्हसदे, पो. ना.प्रविण अशोक वाघमारे, पो. ना. प्रशांत रामदास मरकड, पो. हवा. नाझीमखान पठाण, पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.