Video : आगीशी खेळणं पडलं महागात! इंदिरानगरमध्ये दोन तरुण भाजले!

नाशिक | प्रतिनिधी

अस म्हटलं जातं, आगीशी अन पाण्याशी कोणी खेळू नये, हे काही खोटे नाही. नाशिकमधील दोन तरुणांना याचा प्रत्यय आला आहे. साहसी खेळ करताना हे दोन तरुण भाजले आहेत.

इंदिरानगर परिसरात दोन तरुण भाजल्याची (burnt) घटना घडली आहे. या परिसरात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नववर्षाची स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या कार्यक्रमात आगीशी साहसी खेळ हे दोन्ही तरुण खेळत होते.

पहा थरारक व्हिडीओ:

https://youtu.be/a11bdRUAYg8

यादरम्यान, तोंडातून आग काढताना हे दोन्ही तरुण भाजले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आगीशी खेळणे जीवावर बेतू शकते, अस वारंवार सांगितले जाते. मात्र तरीही अनेकदा कार्यक्रमात असे साहसी खेळ दाखवले जातात.