नाशिक मध्ये उद्धव ठाकरे गटाला बसणार धक्का..! १० ते १२ माजी नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश?

BY- REVATI WALZADE

नाशिक- शिवसेनेतील पक्ष फुटी नंतर उद्धव ठाकरे पक्ष सावरण्याचे काम करत आहे. पक्ष सावरण्यासाठी ते सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतानाच आता नाशकात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी (दि. २९) ठाकरे गटातील १२ नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना नाशकात मोठा धक्का बसणार आहे.

एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर गुहातीला जाणाऱ्या आमदारांमध्ये नाशकातील आ.दादा भुसे, व आ.सुहास कांदे यांचा समावेश होता. त्या नंतर खा.हेमंत गोडसे यांनीही शिंदे गटाचे समर्थन करत शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र नाशकातील शिवसेना कार्यकर्त्यांच जाळ ठाकरे समर्थनात असल्याचे चित्र अजूनही कायम आहे. अश्यातच ठाकरे गटातील माजी नगरसेवक गटाला सोडचिट्ठी देण्याच्या चर्चेमुळे परत एकदा ठाकरे गट अडचणीत येण्याची शक्यता आहे.

एका पाठो-पाठ ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होत आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याचे चिन्ह कुठेच दिसत नाही. नाशिक मधील सध्या शिंदे गट ठाकरे गटाला मोठा झटका देण्याच्या तयारीत दिसत आहे. उद्या १२ माजी नगरसेवक मुंबई मध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यायावर १२ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश सोहळा पार पडणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. नगरसेवकांचा प्रवेश सोहळा पार पडल्यानंतर नाशिक मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन होण्याची देखील चर्चा आहे.

सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांवर सगळ्याच्याच नजरा लागल्या आहेत. त्यापूर्वीच नाशिकमधील माजी नगरसेवक ठाकरे गटाला सोडचिट्ठी देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलाच ढवळून निघालय. नाशिकसह मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे या सर्व महत्वाच्यामहापालिका आहे. यावर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्व पक्षात आपापल्या परीने प्रयत्न केले जात आहे. नाशिकमध्ये ही निवडणुकांसाठी ठाकरे गटाने तयारी सुरू केली आहे. परंतु निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गटाला मोठे आव्हाण स्वीकारावे लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे.