नाशिक : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्री बसवायचे आहे असं विधान केले होते. त्यावर चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची हौस फिटली असल्याचे म्हंटले आहे. त्यांना जर महिला मुख्यमंत्री बसवायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. उध्दव ठाकरे सद्गृहस्थ आहे. मुख्यमंत्री पदावर कुणीही बसलं तरी सद्सदविवेक बुद्धीने काम करावं, पण त्यांच्या काळात महिलांवर किती अत्याचार झाले ? संजय राठोड यांना त्यांच्याच सरकारने (उद्धव ठाकरे) क्लीन चिट दिली होती, माझी लढाई सुरूच राहील’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यभरात अत्याचारात घटनांमध्ये वाढ होत आहे. अशात महिलांसाठी स्पेशल एक्सक्लूजीव कोर्ट्स असणे गरजेचे झाले आहे. या अनुषंगाने राज्य सरकारकडे याबाबत मागणी करण्यात येणार असून लवकरच हा निर्णयही अमलात येईल असं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
राज्यात महिलांवर होणारे अत्याचार पाहता ‘महिलांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट असावे, महाराष्ट्रात फास्ट ट्रॅक कोर्ट चालू नाहीये, तत्कालीन मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) फक्त केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असे आश्वासन देत होते असं म्हणत चित्र वाघ यांनी टोला लाग्वला आहे. दरम्यान, नवी मुंबईतील एका आधाराश्रमात घडलेली अत्याचाराची घटना अधोरेखित करत ‘या प्रकरणात ते आश्रम अनधिकृत आढळले असून, ते आश्रम जमीनदोस्त करण्यात आले आहे असे वाघ यावेळी बोलल्या. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये ज्ञानदीप आधारआश्रमात ७ मुलींवर अत्याचाराच्या संतापजनक घटनेबद्दलही चित्र वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘नाशिकमधील प्रकरणात आमची भीती खरी ठरली. त्या नराधमाने ७ मुलींवर अत्याचार केले. तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांनी मुलींना विश्वासात घेऊन तपास केला. राज्यातील सर्व संस्थांचे ऑडिट व्हावे. आदिवासी विभागाने आपल्या संस्था सुधारण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी चित्र वाघ यांनी केली आहे.
महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत बोलताना चित्र वाघ यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘मुंबईत एका कोरियन महिलेला त्रास देण्याचा प्रकार झाला..त्या आरोपींवार मुंबई पोलिसांनी तत्काळ कारवाई केली मुंबई पोलीस यांचे कौतुक आहे..पण इतर लोकं देखील फक्त बघत होते. याबाबत लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे..आताच्या मुलांना मैत्री करण्यासाठी का ॲपची गरज घ्यावी लागते..? कुठेतरी संवाद दुरावत चालला आहे..अल्पवयीन मुली जबरदस्तीने फुस लावून पळवणे, जबरदस्तीने धर्मांतर असे प्रकार चालू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा असावा,’ अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
संजय राऊत हे सर्वज्ञानी आहे..
चित्र वाघ यांनी पत्रकार परिषदेवेळी बोलताना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे सर्वज्ञानी आहे..ते काहीही टीका टिप्पणी करू शकतात,’ असा टोला त्यांनी लगावला. ‘अंधारे ताई यांच्या इतकं खालच्या पातळीवर जाऊन आम्हाला बोलता येत नाही, आमची मिमिक्री करून त्यांना टाळ्या मिळतात’ अशी टीका केली.