काँग्रेस राष्ट्रवादी सोबत राजकीय मैत्री नको ही भूमिका घेऊन शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडत वेगळी भूमिका घेतली आणि त्यानंतर. त्या चाळीस आमदारांच्या गटाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी केले आणि भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्यपालांसमोर सादर केला त्यानंतर राज्यात शिंदे -फडणवीस सरकार सत्तेवर आले आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेला गळती लागली आहे.
एकीकडे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत पक्षातील गळती थांबवण्यासाठी कामाला लागले असून ते प्रत्यक्षरीत्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना आता मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे . जालन्याची माजी आमदार आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान त्यांनी आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
जालन्याचे खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्यस्थ करून फायर ब्रँड नेता अशी ख्याती असलेल्या अर्जुन खोतकर यांना शिंदे गटात आणल्याच्या चर्चा आहेत. अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळी शिवसेना खासदार धैर्यशील माने , हेमंत पाटील तसेच भाजपचे खासदार संजयकाका पाटील उपस्थित होते.