उमेशची धुलाई, विराटची रिऍक्शन ; ऑस्ट्रलियाविरुद्धच्या सामन्यावर मीम्सचा पाऊस

टी२० च्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाला दिलेल्या २०९ रनांच लक्ष ऑस्ट्रेलियन संघाने पूर्ण केले. भारतीय गोलंदाजांना धावांचा बचाव करता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. दरम्यान सध्या सोशल मीडियावर काल झालेल्या भारतीय संघाच्या पराभवाची तर चर्चा होतच आहे पण त्याहीपेक्षा अधिक चर्चा होत आहे ती माजी कर्णधार विराट कोहली याने सामन्यादरम्यान दिलेल्या एका रिऍक्शनची. सामन्यात उमेश यादवची गोलंदाजी सुरू असताना विराट कोहलीने जे रिऍक्शन दिले आहे त्यावर नेटकरांनी भरभरून मीम्स बनवले आहेत. या मीम्स द्वारे कोणी भारतीय संघाच्या पराभवाचा संताप व्यक्त करत आहे. तर कुणी विराट कोहलीच्या या रिएक्शनची मज्जा घेत आहे.

उमेशची धुलाई विराटचे रिएक्शन..

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू फलंदाजी करत होते. तेव्हा उमेश यादव यांची गोलंदाजी सुरू होती. उमेश यादवच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी त्याला चांगलं धुतलं. मात्र त्यावेळी मैदानात उपस्थित असलेल्या विराट कोहलीने काहीशी वेगळी रिऍक्शन दिली. उमेश यादवची धुलाई पाहून विराट कोहलीने काहीशी रागावलेली, काहीशी घाबरलेली रिऍक्शन दिली. दरम्यान नेटकर्‍यांनी हा फोटो अगदी चांगल्या पद्धतीने मार्गी लावला आहे. या फोटोद्वारे कोणी टीम इंडियावर टीका केली आहे. तर कोणी मजेशीर पोस्ट तयार केली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत भारताने ४ विकेटनी गमावली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत २०९ धावांचे विशाल लक्ष्य उभे केले होते. मात्र, भारतीय गोलंदाज या धावांचा बचाव करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाविद्धची ही मालिका पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डपकच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. अशात पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे संघासह चाहत्यांमध्येही काहीशी निराशा दिसून आली आणि पराभवानंतर टीकाटिप्पणी करणार नाहीत ते भारतीय चाहते कुठले. अशात ही टीका टिप्पणी कोणी मिम्सद्वारे संताप व्यक्त करत केली आहे. तर कोणी मिश्किलपणे.