सर्पदंशाने भावाचा मृत्यू झाला, अंत्यविधी साठी गेला आणि त्यालाही सर्पाने दंश केले व त्यातच त्याचाही मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय, एकाच घरातील दोन जणांवर काळाने घाला घातला, त्यांचा घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना उत्तरप्रदेश मधील भवानीपूर येथील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशातील भवानीपूर गावातील रहिवासी अरविंद मिश्रा ( वय ३८) यांचा मंगळवारी (दि. २) सर्पदंशाने मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी त्यांचा छोटा भाऊ गोविंद मिश्रा (वय २२) लुधियाना येथून आला.
दरम्यान, बुधवारी गोविंद मिश्रा हा झोपेत असताना त्याला सर्पदंश झाला, आणि सोबतच गोविंद याचा लुधियानावरून आलेला मित्र पांडे याला देखील सर्पदंश झाला. यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने गोविंद याचा यात मृत्यू झाला आहे.
गोविंद याचा पांडे याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
मिश्रा कुटुंबियांवर शोककळा पसरली, या शोकांतिकेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच वरिष्ठ वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी भेट दिली तसेच आमदार कैलाशनाथ शुक्ला यांनी देखील कुटुंबियांची भेट घेतली व मदतीचे आश्वासन दिले आहे.