Home » दुर्दैवी..! विद्यार्थ्याचे पर्यटन ठरले अखेरचे, खोल दरीत पाय घसरून..

दुर्दैवी..! विद्यार्थ्याचे पर्यटन ठरले अखेरचे, खोल दरीत पाय घसरून..

by नाशिक तक
0 comment

by : ऋतिक गणकवार

नाशिक : जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सुरतहून (Surat) पर्यटनासाठी आलेल्या १८ वर्षीय विद्यार्थाचा दीड हजार फूट खोल दरीत पाय घसरून पडून दुर्दैवी अंत (An unfortunate death) झाल्याची घटना घडली आहे. सुरगाणा तालुक्यात हा प्रकार घडला असून पिंपळसोंड उंबरपाडा तातापाणी गरम पाण्याचे झरे येथील साखळचोंड धबधब्यावरुन हा विद्यार्थी पाय घसरून पडला आहे. विद्यार्थी तब्बल दीड हजार फूट खोल दरीत पडला होता. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून विद्यार्थाच्या जाण्याने हळहळ व्यक्त व्यक्त करण्यात येत आहे. तक्षिल संजाभाई प्रजापती (वय १८) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.


घटनेची अधिक माहिती अशी की, सुरत येथील सार्वजनिक काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी या महाविद्यालयात तक्षिल प्रजापती हा दुस-या वर्षात शिकत होता. तक्षिल व आणखी दहा ते बारा मित्र सुरत येथून सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे सहलीसाठी आला होता. दरम्यान परिसरात फिरस्ती करताना बुधवारी (दि. २३) दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास तक्षिल व त्याचे दहा ते बारा मित्र उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील वाहूटचोंड शाॅवर पाॅंईट धबधब्यावर अंघोळ करीत असतांना खडकावर शेवाळ असल्याने त्याचा पाय घसरुन दीड हजार फूट खाली खडकावर आपटल्याने डोक्याला गंभीर इजा झाली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेने खळबळ

तक्षिल खाली पडल्याने मित्रांनी मदतीसाठी धावा केला. घटना वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती ग्रामस्थ व पोलीस व वन कर्मचारी अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दीड हजार फूट खाली खडकावर आपटल्याने डोक्याला गंभीर इजा झाली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला व तीवशीची माळी येथे आणला. दरम्यान घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्याच्या या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी पाच वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

उपायोजनांची गरज

सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड परिसरात व आजूबाजूला मोठ्या-प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ असते. परिसरात सुट्टीच्या दिवशी प्रामुख्याने गुजरात राज्यातील आणि नाशिकसह राज्यभरातील पर्यटक येत असतात. मात्र काही ठिकाणी सुरक्षेच्या उणीवा आहेत. अश्या या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी ग्रामस्थांकडून यावर ठोस उपायोजना करण्याची मागणी होत आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!