दुर्दैवी! दोघे भाऊ मौजेत अंघोळीला गेले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने…

कोल्हापूर : एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवार असल्याने दोन सख्खे भाऊ तळ्यावर अंघोळीला गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू (An unfortunate death) झाला आहे. ही घटना रविवार (दि. ४ ) कोल्हापुरातील (Kolhapur) करवीर तालुक्यातील भामटे येथे घडली आहे. घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चिमुकल्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजवीर पाटील (Rajveer Patil) आणि समर्थ पाटील (Samarth Patil) असे मृत झालेल्या भावांची नावे आहेत.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील भामटे येथील ही धक्कादायक घटना आहे. राजवीर आणि समर्थ रविवार असल्याने दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गावातील तळ्यात आंघोळ करण्यासाठी गेले होते. तळ्यात उतरले मात्र दोघा भावांना पाण्याचा अंदाज न आल्याने तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

काळजाचा ठेका चुकवणारी ही घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजवीर आणि समर्थ या दोघांच्या मृत्यूने भामटे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेने संपूर्ण कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. दोन बालक असे पाण्यात बुडाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे आपल्या पाल्यांना अश्या पाण्याच्या ठिकाणावर काळजी घेणे आवश्यक आहे. नदी, तलाव, कालवे अश्या ठिकाणी आपल्या मुलांसोबत असणे आवश्यक आहे. पुन्हा अशी घटना घडणार याची काळजी घेणे . लहान मुलांना एकटेच पाण्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.