दुर्दैवी ! लग्नाच्या विधी सुरु असताना नवरदेव बेशुध्द पडला आणि मग..

लग्नात फोटोशूट सुरु असताना नवरदेव बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही घटना बिहार मधील आहे. एका लग्नात वरमाला टाकून झाल्यानंतर वर-वधूचे फोटोशूट सुरु होते अशात अचानक नवरदेवाला अस्वस्थ वाटू लागले. तो अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडलं आणि नानात्र तो मृत झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आले.

झाले असे की,  नवरदेव वरात घेऊन वधूकडे आला. वरातीचे स्वागत केल्यानंतर नवरा-नवरी स्टेटजवर आले. यानंतर नवरीने नवऱ्याची आरती करत एकेमकांना वरमाला घातली. यानंतर फोटोसेशन सुरु झाले. लग्नात जोरजोरात डीजे सुरु होता. त्यामुळे नवरदेवाला अस्वस्थ वाटू लागले. त्याने अनेकदा डीजे बंद करण्यास देखील सांगितले.

मात्र डीजेचा आवाज बंद झाला नाही. आवाजामुळे नवरदेव अधिकच अस्वस्थ झाला. थोड्या वेळात तो अचानक बेशुध्द झाला. हे पाहून सर्व घाबरले. त्याच्याकडे धाव घेतली. त्याला उठवण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला दुसरे रुग्णालय रेफर केले.

दरम्यान नवरदेवाला पुढील रुग्णालयात नेट असताना वाटेतच त्याचा दुर्दैवी मृतू झाला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली. ज्या ठिकाणी काही वेळेपूर्वी लग्नाच्या आनंदाचे, उत्साहाचे वातावरण होते. हसत-खेळत विधी पार पडत होत्या. त्या ठिकाणी काही वेळातच सर्व दृश्य बदलले आणि आनंदाचे वातावरण शोकसभेत परावर्तित झाले.