केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

By चैतन्य गायकवाड

अकोला: ज्येष्ठ भाजप नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (central minister nitin gadakari) यांना मानद पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. अकोला (akola) येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा (dr. Panjabrao Deshmukh agriculture university) ३६ वा वार्षिक दीक्षांत समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. या समारंभात राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsinh Koshyari) यांच्या हस्ते नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (doctor of science) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.

कृषी क्षेत्रातील बहुमोल योगदानाबाबत नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. या दीक्षांत समारंभामध्ये ३६४६ स्नातकांना (graduates) विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, अन्नशास्त्र तसेच कृषी अभियांत्रिकी अशा पदव्यांचा समावेश आहे. तसेच काही विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, रोप्य पदके व रोख पारितोषिके देखील प्रदान करण्यात आली.

नितीन गडकरी हे भाजपचे (BJP) ज्येष्ठ सदस्य असून, त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद देखील भूषवले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून म्हणजे २०१४ सालापासून ते केंद्रात मंत्रीपद भूषवत आहे. गेल्या आठ वर्षाहून अधिक काळ ते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग या खात्याचा कार्यभार पाहत आहे. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात सध्या देशात राष्ट्रीय महामार्ग (national highway) बांधकामाचा वेग वाढला आहे. सध्या देशभरात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणण्याचे काम जोरात सुरू आहे. नितीन गडकरी यांनी कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले आहे. कृषी क्षेत्रातील या कामगिरीसाठी त्यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.