बदलापूर : पती-पत्नीच्या भांडणात मेहुणीचा बळी गेला आहे. धारदार शस्त्राने पतीने पत्नीवर हल्ला चढवला, आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी बहिण पुढे धजावली. मात्र पतीने मेहुणीवर देखील धारदार शस्त्राने वार केला त्यातच तिचा मृत्यू झाला. पतीने पत्नीवर आणि तिच्या आईवर देखील हल्ला चढवला असून त्या गंभीर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही धक्कादायक घटना बदलापूर गावातील आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलोफरच आणि मोहम्मद आयुब शेख असे दाम्पत्य आहेत. मात्र त्यांचे एकमेकांशी पटत नसल्याने निलोफर ही आपल्या आईकडे बदलापूर गावातील सनसेट हाईट इमारतीत वास्तव्यास आहे. आज मंगळवारी (दि. २९ ) ६ वाजता मोहम्मद आयुब शेख हा निलोफरकडे आला. मात्र दरवाजा उघडताच त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने निलोफरवर हल्ला केला. या हल्ल्यात निलोफर ही गंभीर जखमी झाली, हे पाहून त्याची मेहुणी सनोबर आणि तिची आई फरीदा या दोघी तिला वाचवायला मध्ये पडल्या. मात्र मोहम्मदने त्या दोघींवरही हल्ला चढवला आणि सनोबरच्या घाव वर्मी बसला ती जागीच कोसळून तिचा मृत्यू झाला.
हल्ल्यात दोघी मायलेकी जखमी झाल्या आहेत. संशयिताने तिघी मायलेकींवर हल्ला चढवताच आजूबाजूंच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व संशयिताला पकडून ठेवले. काहींनी तिघींना बदलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. यात सनोबर मृत्यू झाला असून दोघी मायलेकींवर उपचार सुरु आहेत.
हत्येच कारण पोलीस तपासात उघड
संशयित आरोपी मोहम्मद शेख हा दुबई देशात कामाला होता. तसेच निलोफर आणि मोहम्मद याचे सतत भांडण होत होते. यामुळे निलोफर ही आपल्या आई आणि बहिणीसोबत तिच्याकडे राहत होती. मात्र जोगेश्वरी येथे त्यांची एक मालमत्ता होती. त्या मालमत्तेवरून या दोघांमध्ये वाद होते. याच वादातून ही हत्या झाल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली आहे.