विजय मल्ल्याला 4 महिन्यांचा तुरुंगवास

भारतातील बँकांचं कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट उद्योगपती विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यांचा तुरुंगवास आणि 2 हजारांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींचे खंडपीठने हा निकाल सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 10 मार्च रोजी निकाल राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती विजय माल्ल्याला न्यायालयाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरवले होते.


9 जून 2017 रोजी, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन, मल्ल्याने 40 दशलक्ष डॉलर त्याच्या तीन मुलांच्या नावे हस्तांतरित केले होते. त्यानंतर तो न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला. मल्ल्याला 2017 मध्ये अवमान प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होत. तर त्याला 11 जुलै रोजी साल्याने शिक्षा सुनावली.आहे. त्यामुळे आता विजया मल्ल्याच्या अडचणीत अधिक वाढ होणार आहे. विजय मल्ल्या हा 9 हजार कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणातील आरोपी आहे.


मल्ल्या विरुद्ध अवमान खटल्यातील शिक्षेबाबत युक्तिवाद झाल्यानंतर 30 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणातील न्यायालयीन सल्लागार जयदीप गुप्ता यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याच्या वकिलांना या प्रकरणी लेखी युक्तिवाद करु शकतात असं सांगितलं होतं. न्यायालयाच्या सल्लागाराने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, “मल्ल्याला न्यायालयाची नोटीस मिळाली असेल अशी अपेक्षा करायला हवी.” यादरम्यान त्यांना नोटीसबद्दल माहिती देण्यात आली होती.


त्यांच्याकडून कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत, असं मल्ल्याचे वकील अंकुर सैगल यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अनेक संधी दिल्यानंतरही मल्ल्या हजर न झाल्याने पुढील कारवाई करावी, असं न्यायालयाच्या सल्लागाराने म्हटलं होतं. “विजय मल्ल्याकडे बँकेचे 9,000 कोटी रुपये थकित आहेत ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे,” असा युक्तिवाद न्यायालयीन सल्लागार जयदीप गुप्ता यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मल्ल्याच्या शिक्षेवर केला होता.