टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या बऱ्याच दिवसांपासून खेळात फॉर्ममध्ये दिसत नाही त्यामुळे त्याच्यावर चाहता वर्ग हि नाराज आहे . विराट ने गेल्या दोन -अडीच एकही शतक ठोकलेला नाही.त्याच्या सध्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टीकाहि होत आहे.त्याच्याबाबतीत उलटसुलट चर्चा होत आहे. असे असले तरी विराटचा चाहता वर्ग मोठा आहे . अजूनही विराटचा फॉर्म बदलेले आणि विराट पुन्हा खेळेल अशी अशा आता त्याच्या चाहत्यांना आहे. विराट सध्या खराब कामगिरीने चर्चेत आला आहे अश्यातच तो आता आणखी एका विक्रमणारे चर्चेत आला आहे . आणि हा विक्रम आशिया खंडात तरी कोणत्याच खेळाडूला करता आला नाहीए, विराटचा फॉर्म खेळात नसला तरी तो मात्र सोशल मीडियावर फॉर्ममध्ये आहे.
विराट चा चाहता वर्ग सोशल मीडियावरही आहे . hopperhq.com कडून नुकतीच इंस्टाग्रामची 2022 ची रिच लिस्ट जारी करण्यात आली आहे. या यादीत इंस्टाग्रामवरील एका पोस्टवरून सर्वाधिक कमाई करणाऱ्या आशियाई खेळाडूंमध्ये कोहली अव्वल आला आहे. तर जागतिक क्रमवारी विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. या आदी नुसार विराट कोहली एका इंस्टाग्राम पोस्टवरून $1,088,000 (जवळपास 8.69 कोटी रुपये) कमावतो. अशाप्रकारे तो आशियातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. कोहलीचे सध्या 20 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.त्यामुळे विराटचा फॉर्म इंस्टाग्रामवर अजूनही जोरातच आहे . आणि या विक्रमाची चर्चा आता त्याच्या चाहत्यांसह सर्वच स्थरावर रंगू लागली आहे.